नमस्कार शेतकरी मित्रांनो,
वारस नोंद (Varas Nond) करताना अनेकदा बहिणी किंवा इतर वारसदार आपली नावे कमी करण्यासाठी तयार असतात. यासाठी बऱ्याचदा गावातल्या गावात १०० किंवा ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 'ना-हरकत प्रतिज्ञापत्र' (Affidavit) किंवा 'संमती पत्र' लिहून दिले जाते आणि तलाठ्याकडे फेरफार करण्यासाठी अर्ज केला जातो.
पण सावधान! हा मार्ग पूर्णपणे चुकीचा आणि बेकायदेशीर आहे.
आज आपण पाहूया की, कायदेशीररित्या 'हक्कसोड पत्र' (Relinquishment Deed) नक्की कसे करावे लागते आणि कायदा काय सांगतो?





