मोबाईलवर 'डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२' कसा काढायचा? तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही! (२०२५ ची नवीन पद्धत)

 मी तुमचा मित्र आणि 'महसूल मार्गदर्शक'.

अनेकदा आपल्याला बँक लोनसाठी, पीएम किसान योजनेसाठी किंवा कोर्ट कामासाठी ७/१२ उतारा लागतो. यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात किंवा सेतू केंद्रात जास्तीचे पैसे द्यावे लागतात.

पण तुम्हाला माहित आहे का? आता महाराष्ट्र शासनाने 'डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२' उपलब्ध करून दिला आहे, जो पूर्णपणे कायदेशीर आहे. त्यावर तलाठ्याच्या सही/शिक्क्याची गरज नसते.

आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की, घरबसल्या मोबाईलवर ओरिजिनल ७/१२ कसा काढायचा.

डिजिटल ७/१२ काढण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत:

स्टेप १: वेबसाईटवर जा

सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर Google Chrome उघडा आणि digitalsatbara.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. (फसव्या वेबसाईटपासून सावध राहा).

स्टेप २: लॉगीन (Login) करा

जर तुमचे जुने अकाऊंट असेल तर Login ID आणि Password टाका.

जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर 'New User Registration' वर क्लिक करून तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाकून अकाऊंट बनवा.

स्टेप ३: गाव आणि गट नंबर निवडा

लॉगीन झाल्यावर तुमच्यासमोर Recharge Account असे येईल. ७/१२ काढण्यासाठी शासनाची फी १५ रुपये आहे. त्यामुळे आधी तुमच्या अकाऊंटमध्ये १५ रुपये किंवा ५० रुपये टाकून रिचार्ज करा.

त्यानंतर:

जिल्हा (District) निवडा (उदा. चंद्रपूर).

तालुका आणि गाव (उदा. सिंदेवाही) निवडा.

तुमचा गट नंबर (Survey No) टाका.

स्टेप ४: ७/१२ डाऊनलोड करा

गट नंबर टाकल्यावर 'Download' बटणावर क्लिक करा. तुमच्या खात्यातून १५ रुपये कापले जातील आणि काही सेकंदात तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात ७/१२ डाऊनलोड होईल.

⚠️ तलाठ्याचा महत्वाचा सल्ला (Expert Tip):

एक महसूल कर्मचारी म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की,

१. कायदेशीर मान्यता: या डिजिटल ७/१२ वर खाली एक हिरव्या रंगाची बरोबरची खूण (✅) असते आणि "Digitally Signed By..." असे लिहिलेले असते. हा उतारा बँकेत, कोर्टात आणि कोणत्याही शासकीय कामात १००% चालतो. तलाठ्याच्या सहीची सक्ती करता येत नाही.

२. फसवणूक टाळा: फक्त बघण्यासाठी (View Only) असलेला ७/१२ वेगळा असतो आणि हा 'डिजिटल सहीचा' वेगळा असतो. कामासाठी नेहमी डिजिटल सहीचाच वापरा.

तुम्हाला काही अडचण येत असल्यास खाली कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा आमच्या 'सातबारा कट्टा' टीमशी संपर्क साधा.

तुमचाच,

ॲडमिन (सातबारा कट्टा)

Comments