Posts

मोबाईलवर 'डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२' कसा काढायचा? तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही! (२०२५ ची नवीन पद्धत)

 मी तुमचा मित्र आणि 'महसूल मार्गदर्शक'. अनेकदा आपल्याला बँक लोनसाठी, पीएम किसान योजनेसाठी किंवा कोर्ट कामासाठी ७/१२ उतारा लागतो. यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात किंवा सेतू केंद्रात जास्तीचे पैसे द्यावे लागतात. पण तुम्हाला माहित आहे का? आता महाराष्ट्र शासनाने 'डिजिटल स्वाक्षरीचा ७/१२' उपलब्ध करून दिला आहे, जो पूर्णपणे कायदेशीर आहे. त्यावर तलाठ्याच्या सही/शिक्क्याची गरज नसते. आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की, घरबसल्या मोबाईलवर ओरिजिनल ७/१२ कसा काढायचा. डिजिटल ७/१२ काढण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत: स्टेप १: वेबसाईटवर जा सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर Google Chrome उघडा आणि digitalsatbara.mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. (फसव्या वेबसाईटपासून सावध राहा). स्टेप २: लॉगीन (Login) करा जर तुमचे जुने अकाऊंट असेल तर Login ID आणि Password टाका. जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर 'New User Registration' वर क्लिक करून तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाकून अकाऊंट बनवा. स्टेप ३: गाव आणि गट नंबर निवडा लॉगीन झाल्यावर तुमच्यासमोर Recharge Account असे येईल. ७/...